Back

ⓘ भाषा                                               

भाषा

भाषेविषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या, तो त्या कुतूहलाच्याच पूर्तीचा प्रयत्न होय. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादि प्रगट करण्याचे साधन आहे, ही जाणीव तर पूर्वीपासून होतीच. पण या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न आधुनिक कालखंडात विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली. बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचे आपणास दिसून येते. वेगवेगळ्या जाती धर्माची भाषा वेगवेगळी असू शकते. मराठीतील भाषा हा शब्द ...

                                               

इंग्लिश भाषा

Ho इंग्लंड देशात राहणार्‍या लोकांना इंग्रज म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला इंग्रजी. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. इंग्रजी भाषा ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. कित्येक देशांची दुसरी भाषा व शासकीय भाषा आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणार्‍या व समजल्या जाणार्‍या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते. ३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची दुसरी भाषा. जगभरा ...

                                               

भारतामधील भाषा

भारतातील भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटांतील आहेत. १. इंडो-युरोपीय २. द्रविडीय भाषा. भारतात इतर बोलल्या जाणार्‍या भाषा या ऑस्ट्रो-एशियाटिक आणि तिबेटो-बर्मन भाषिक गटांतील तसेच स्वतंत्र भाषा आहेत. अंदमान बेटांवर बोलली जाणारी अंदमानी भाषा ही कोणत्याही भाषिक गटांशी निगडित नाही असे वाटते. भारतातील बोलीभाषांची संख्या ही १२२२, तर देशातील २३४ भाषा या कुणाच्या ना कुणाच्या मातृभाषा आहेत. त्यांपैकी २४ भाषा बोलणार्‍या भाषकांची संख्या ही प्रत्येकी दहा लाख किंवा अधिक आहे. भारतीय भाषांच्या इतिहासात फारसी आणि इंग्रजी भाषांचा प्रभाव मोठा आहे. संस्कृत आणि तमिळ या भाषा या भारतातील सर्वांत जुन्या भाषा म ...

                                               

बंगाली भाषा

बंगाली ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आणि बांग्लादेशात बोलली जाणारी भाषा आहे. संस्कृत, पाली व प्राकृत या भाषांमधून बंगाली भाषेचा जन्म झाला. बंगाली बंगाल नामक प्रदेशात बोलली जाणारी भाषा असून, या प्रदेशात सध्याचा बांग्लादेश व भारतातील पश्चिम बंगाल राज्य यांचा समावेश होतो. बंगाली भाषिकांची एकूण संख्या २३ कोटीच्या आसपास असून, जगातील सर्वाधिक प्रचलित भाषांमध्ये मोडते. बंगाली बांग्लादेशातील प्रमुख भाषा असून भाषिक संख्येत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. बंगाली व आसामी भाषा इंडो-इराणी भाषाकुळातील भौगोलिकदृष्ट्या सर्वांत पूर्वेकडच्या भाषा आहेत.

                                               

हिंदी भाषा

हिंदी ही भारत देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. सध्या भारताच्या दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही भारत सरकारच्या कामकाजाची भाषा आहे अनेकजण हिंदीला राष्ट्रभाषा असे समजतात परंतु हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. भारतीय राज्यघटनेनुसार सर्व २२ भाषा अधिकृत आहेत.आपला देश समनतेला महत्व देतो त्यामुळेच सर्व भाषा समान आहेत. हिंदी ही राष्ट्रभा ...

                                               

तमिळ भाषा

तमिळ भाषा ही एक द्राविड भाषा असून ती तमिळ लोकांची मातृभाषा आहे. तमिळ दक्षिण आशियातील एक प्राचीन भाषा आहे. दक्षिण भारतातील "तमिळनाडु" तसेच पोंडेचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजभाषा आहे तसेच भारतातील ‘अभिजात भाषे’चा पहिला मान तमिळ भाषेला देण्यात आला असून ६.५ कोटीहून अधिक लोक ही भाषा वापरतात. श्रीलंका आणि सिंगापूर देशात तमिळ भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तसेच ती न्यूनाधिक प्रमाणात मलेशिया आणि मॉरिशस येथेही दैनंदिन वापरात आढळून येते. तमिळ भाषेला स्वतःची अशी विशिष्ट तमिळ लिपी आहे. ह्या भाषेतील साहित्य सुमावर्षाहून अधिक प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील लेख थाय ...

कन्नड भाषा
                                               

कन्नड भाषा

कन्नड ही भारत देशाच्या कर्नाटक राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा सुमारे ३.८ कोटी लोक बोलतात. भाषिक संख्येच्या बाबतीत कन्नडचा जगातील ४० आघाडीच्या भाषांमध्ये क्रमांक लागतो.

मलयाळम भाषा
                                               

मलयाळम भाषा

मलयाळम किंवा मल्याळम/मलयाळं/मलयाळम् ही द्राविड भाषाकुळातील चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून केरळ राज्यात व नजीकच्या लक्षद्वीप व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजभाषा आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे.

जपानी भाषा
                                               

जपानी भाषा

जपानी भाषा ही जपानची अधिकृत भाषा आहे. सुमारे १२,५०,००,००० व्यक्ती ही भाषा बोलतात. ही भाषा बोलणारे मुख्यत्त्वे जपानमध्ये राहणाऱ्या व जपानी वंशाच्या व्यक्ती आहेत. जपानी भाषेत एकूण ३ प्रकारच्या लिपी आहेत. ह्या ३ लिपी म्हणजे हिरागाना, काताकाना व कांजी होय.

फिनिश भाषा
                                               

फिनिश भाषा

फिनिश अथवा सुओमी ही फिनलंड देशातील बहुसंख्यांची भाषा असून फिनलंडाच्या अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. स्वीडनात हिला अधिकृत अल्पसंख्याक भाषेचा दर्जा आहे. उत्तर युरोपातील इतर देशांमध्येदेखील ही भाषा वापरली जाते. जगभरात एकंदरीत ६० लाख भाषक फिनिश वापरतात.

                                               

अर्थ (भाषा)

अर्थ म्हणजे स्रोत किंवा प्रेषक काय व्यक्त करत आहे आहे त्याचे संप्रेषण. आणि निरीक्षक किंवा प्राप्तकर्ता त्या संदेशात काय व कसे प्रकट होते आहे याचे समजणे म्हणजे अर्थ होय. किंवा प्राप्तकर्ता ते कसे समजून घेतो आहे याचा विचार अशीही त्याची व्याख्या होऊ शकेल.

ऑक्सितान भाषा
                                               

ऑक्सितान भाषा

ऑक्सितान ही युरोपातील एक भाषा आहे. ही भाषा स्पेनच्या ईशान्य व फ्रान्सच्या दक्षिण भागात वापरली जात असून ती कातलान भाषेसोबत मिळतीजुळती आहे. रोमान्स भाषासमूहामधील कातालान, रोमेनियन, स्पॅनिश, रोमेनियन, पोर्तुगीज व सार्दिनियन भाषांप्रमाणे ऑक्सितान देखील रोमान साम्राज्यकाळातील लॅटिनपासून निर्माण झाली आहे. युनेस्कोने ह्या भाषेच्या दीर्घकालीन भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

तगालोग
                                               

तगालोग

तगालोग ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा आग्नेय आशियामधील फिलिपिन्स ह्या देशामधील प्रमुख भाषा आहे. राष्ट्रभाषा आहे. फिलिपिनो ही फिलिपिन्सच्या दोनपैकी एक अधिकृत भाषा तगालोगचीच आवृत्ती आहे.

                                               

ताहिती भाषा

ताहिती ही पॉलिनेशियन भाषासमूहातील एक भाषा आहे जी मुख्यत: फ्रेंच पॉलिनेशियातील सोसायटी द्वीपसमूहामध्ये बोलली जाते. ती पूर्व पॉलिनेशियन भाषासमूहांचा एक भाग आहे. लंडन मिशनरी सोसायटीच्या मिशनरिंनी १९व्या शतकामध्ये ताहितीला तोंडी बोलिभाषेपासून लिखित भाषा बनवले.

तुर्कमेन भाषा
                                               

तुर्कमेन भाषा

तुर्कमेन ही मध्य आशियामधील तुर्कमेनिस्तान देशाची राष्ट्रभाषा आहे. १९२८ सालापर्यंत तुर्कमेन भाषेत लिहिण्याकरिता अरबी वर्णमालेचा वापर केला जात असे तर १९२९ ते १९३८ दरम्यान लॅटिन वर्णमाला वापरली गेली. सोव्हियेत संघाच्या राजवटीखाली १९३८ ते १९९१ दरम्यान सिरिलिक वर्णमाला वापरून तुर्कमेन भाषा लिहिली गेली. १९९१ नंतर सध्या तुर्कमेनिस्तान शासनाने अधिकृत सुचनांसाठी पुन्हा लॅटिन वर्णमाला वापरण्याचा निर्णय घेतला.

नेपाळ भाषा
                                               

नेपाळ भाषा

नेपाळ भाषा ही चिनी-तिबेटी भाषाकुळातील भाषा आहे जी नेपाळमधल्या प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भाषा नेपाल भासा, नेवाः भाये आणि नेवारी म्हणूनही ओळखली जाते. नेवारी ह्याच नावाची एक प्राचीन लिपी देखील नेपाळमध्ये प्रचलित आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →