Back

ⓘ फुटबॉल                                               

फुटबॉल

फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात ११ खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू तो संघ विजेता ठरतो. १९०४ रोजी पॅरिस येथे फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅंडहाॅलंड, डेन्मार्क, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन फिफा ही संघटना स्थापन केली. इ.स. १८६३ साली फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फु ...

                                               

जर्मनी फुटबॉल संघ

जर्मनी फुटबॉल संघ हा जर्मनी देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ इ.स. १९०८ सालापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. इ.स. १९५० ते १९९० दरम्यान हा संघ पश्चिम जर्मनी देशासाठी खेळत असे. दुसऱ्या महायुद्धानंतर जारलांड व पूर्व जर्मनी हे दोन वेगळे संघ स्थापित होते. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर पूर्व जर्मनी संघ पश्चिम जर्मनीमध्ये विलिन करण्यात आला व जर्मनी संघ पुन्हा एकसंध बनला. ऐतिहासिक काळापासून जर्मनी हा जगातील सर्वात बलाढ्य फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. जर्मनीने आजवर ४ फिफा विश्वचषक व ३ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपदे जिंकली आहेत तर चार विश्वचषकांमध्ये व तीन युरोपियन स्प ...

                                               

अरिना फुटबॉल

अरिना फुटबॉल हा अरिना फुटबॉल लीग आणि चीन एरेना फुटबॉल लीग द्वारे खेळल्या गेलेल्या इनडोर ग्रिडिरॉन फुटबॉलचा एक प्रकार आहे. हा खेळ, अमेरिकेतील किंवा कॅनेडियन आउटडोअर फुटबॉलपेक्षा लहान क्षेत्रामध्ये खेळला जातो, ज्यामुळे तो एक जलद आणि उच्च-स्कोअरिंग खेळ होतो. १९८१ मध्ये या खेळाचा शोध लावला गेला आणि १९८७ मध्ये राष्ट्रीय फुटबॉल लीग आणि युनायटेड फुटबॉल लीगचे माजी कार्यकारी जिम फोस्टर यांनी त्याचे पेटंट घेतले. पेटंटची मुदत संपल्यानंतर २००७ पर्यंत तो एक पेटंट खेळ होता. जरी इनडोअर अमेरिकन फुटबॉलचा एकमात्र वेगळा प्रकार नसला तरी तो सर्वात व्यापकपणे ओळखला जातो आणि ज्यावर आधुनिक फुटबॉलचा इतर प्रकार कमीत ...

                                               

आसनक्षमतेनुसार फुटबॉल मैदानांची यादी

खाली आसनक्षमतेनुसार फुटबॉल खेळाच्या मैदानांची यादी दिलेली आहे. See also Canadian फुटबॉल League स्टेडियमs List of फुटबॉल स्टेडियमs by country राष्ट्रीय Basketball Association arenas List of स्टेडियमs List of African स्टेडियमs by capacity List of स्टेडियमs by capacity List of American फुटबॉल स्टेडियमs by capacity List of tennis स्टेडियमs by capacity List of North American स्टेडियमs by capacity List of Test cricket grounds List of ऑस्ट्रेलियाn फुटबॉल League grounds List of Oceanian स्टेडियमs by capacity List of indoor arenas List of Asian स्टेडियमs by capacity List of Major League Baseball स् ...

                                               

जागतिक फुटबॉल एलो गुणांकन

जागतिक फुटबॉल एलो गुणांकन ही एलो गुणांकन पद्धत जगामधील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघांची क्रमवारी ठरवण्यासाठी वापरली जाते. एलो क्रमवारी फिफाच्या जागतिक क्रमवारी पेक्षा वेगळी आहे.

                                               

पंच (फुटबॉल)

पंचाचे अधिकार व कर्तव्य नियमांनुसार खालील प्रकारे आहेत. अधिकार संघ अधिकारी जर नियमांनुसार वागत नसतील तर त्यांना मैदानाच्या बाहेर काढणे. एखादा खेळाडू थोडा जखमी असल्यास, चेंडू मैदानाच्या बाहेर जाई पर्यंत सामना चालू ठेवणे; जर एका संघा विरूद्ध नियम भंग झाला असेल व सामना चालू राहिल्याने त्या संघाचा फायदा होणार असेल तर सामना न थांबवता चालू ठेवणे; बाह्य दखलंदाजी झाल्यास सामना थांबवणे, निलंबित करणे किंवा रद्द करणे; एखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास, फुटबॉल मैदानाच्या बाहेर नेई पर्यंत सामना थांबवणे; नियमांचा भंग झाल्यास सामना थांबवणे, निलंबित करणे किंवा रद्द करणे; नियम भंग करणार्‍या खेळाडूला शिक्षा करण ...

                                               

फिफा कॉन्फेडरेशन्स चषक

फिफा कॉन्फेडरेशन्स चषक ही एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. फिफाद्वारे आयोजीत केली जाणारी ही स्पर्धा सध्या दर चार वर्षांनी खेळवली जाते. ह्या स्पर्धेत जगातील सहा फुटबॉल महामंडळांमधून प्रत्येएक संघ निवडला जातो. विद्यमान विश्वचषक विजेता तसेच आगामी विश्वचषक स्पर्धेचा यजमान देश ह्यांना ह्या स्पर्धेत आपोआप प्रवेश मिळतो. आशियामधून ए.एफ.सी. आशिया चषक विजेता, आफ्रिकेमधून आफ्रिका देशांचा चषक विजेता, उत्तर व मध्य अमेरिकेमधून कॉन्ककॅफ गोल्ड चषक विजेता, दक्षिण अमेरिकेमधून कोपा अमेरिका विजेता, ओशनियामधून ओ.एफ.सी. देशांचा चषक विजेता तर युरोपामधून युएफा यूरो विजेता देश कॉन्फडेरशन्स चषकासाठी पात्र ठरतात ...

                                               

युएफा

युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. सध्या युरोपामधील ५३ देशांचे फुटबॉल संघ युएफाचे सदस्य आहेत.

इंग्लंड फुटबॉल संघ
                                               

इंग्लंड फुटबॉल संघ

इंग्लंड फुटबॉल संघ हा इंग्लंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. स्कॉटलंडसह इंग्लंड हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. १८७२ साली जगातील पहिला फुटबॉल सामना ह्या दोन देशांदरम्यान खेळवण्यात आला होता.

कॅनेडियन फुटबॉल
                                               

कॅनेडियन फुटबॉल

कॅनेडियन फुटबॉल हा प्रामुख्याने कॅनडा देशामध्ये खेळला जाणारा एक खेळ आहे. हा खेळ अमेरिकन फुटबॉल सोबत मिळताजुळता आहे. रग्बी फुटबॉलची सुरुवात कॅनडामध्ये अंदाजे १८६० मध्ये झाली. ह्यामधून कालांतराने कॅनेडियन फुटबॉल खेळ निर्माण झाला. सध्या कॅनेडियन फुटबॉल लीग ही ह्या खेळामधील सर्वात मोठी व्यावसायिक लीग आहे.

आशिया फुटबॉल मंडळ
                                               

आशिया फुटबॉल मंडळ

आशिया फुटबॉल मंडळ हे आशिया खंडामधील ४६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे. ह्या भागातील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी ए.एफ.सी.वर आहे. दर चार वर्षांनी ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी.द्वारे आयोजित केली जाणारी प्रमुख स्पर्धा आहे. इस्रायल हा देश भौगोलिक दृष्ट्या आशियामध्ये असला तरीही तो युएफाचा सदस्य आहे तसेच ऑस्ट्रेलिया देश ओशनियामधील ओशनिया फुटबॉल मंडळाचा सदस्य नसून २००६ सालापासून ए.एफ.सी.मध्ये सहभाग घेतो आहे.

फ्रान्स फुटबॉल संघ
                                               

फ्रान्स फुटबॉल संघ

फ्रान्स फुटबॉल संघ हा फ्रान्स देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने पॅरिसमधील स्ताद दा फ्रान्समधून खेळतो. फ्रान्सने आजवर १२ फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून १९९८ साली अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिकमध्ये फ्रान्सने सुवर्ण तर १९०० पॅरिस स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले.

पोर्तुगाल फुटबॉल संघ
                                               

पोर्तुगाल फुटबॉल संघ

पोर्तुगाल फुटबॉल संघ हा पोर्तुगाल देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. पोर्तुगाल आजवर ५ फिफा विश्वचषक व ६ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.

नेदरलँड्स फुटबॉल संघ
                                               

नेदरलँड्स फुटबॉल संघ

नेदरलँड्स फुटबॉल संघ हा नेदरलँड्स देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. नेदरलँड्स आजवर ९ फिफा विश्वचषक व ९ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे. आजवर ३ विश्वचषकांच्या अंतिम फेरीमध्ये खेळलेला व एकदाही अजिंक्यपद न जिंकलेला नेदरलँड्स हा जगातील एकमेव संघ आहे.

कर्णधार (फुटबॉल)
                                               

कर्णधार (फुटबॉल)

कर्णधार हा फुटबॉल खेळामधील संघाचा नेता व प्रमुख खेळाडू आहे. क्रिकेट खेळामधील कर्णधारावर सामन्यादरम्यानच्या डावपेचांची संपूर्ण जबाबदारी असते. परंतु फुटबॉल कर्णधाराला नाणेफेकीव्यतिरिक्त चालू सामन्यामध्ये विशेष अधिकार नसतात.

डेन्मार्क फुटबॉल संघ
                                               

डेन्मार्क फुटबॉल संघ

डेन्मार्क फुटबॉल संघ हा डेन्मार्क देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. डेन्मार्कने आजवर ४ फिफा विश्वचषकांमध्ये तर ८ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. १९९२ सालची यूरो ही डेन्मार्कने आजवर जिंकलेली एकमेव प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. उन्हाळी ऑलिंपिकमध्ये डेन्मार्क संघाला आजवर ३ सुवर्ण तर एक कांस्य पदक मिळाले आहे.

आफ्रिकन देशांचा चषक
                                               

आफ्रिकन देशांचा चषक

आफ्रिकन देशांचा चषक ही आफ्रिकन फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्यातील विजेत्याला आफ्रिकाचा विजेता हे पद मिळते तसेच फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते. इ.स. १९५७ साली ही स्पर्धा पहिल्यांदा खेळवली गेली व १९६८ पासून दर दोन वर्षांनी खेळवली जात आहे. इजिप्तने आजवर आफ्रिकन देशांचा चषक सर्वाधिक वेळा ७ वेळा जिंकला आहे.

ऑलिंपिक खेळ फुटबॉल
                                               

ऑलिंपिक खेळ फुटबॉल

फुटबॉल हा खेळ इ.स. १८९६ व इ.स. १९३२ चा अपवाद वगळता आजवर सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये खेळवला गेला आहे. इ.स. १९९६ पासून महिला फुटबॉल देखील ऑलिंपिकच्या कार्यक्रमात समाविष्ट केला जात आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →