Back

ⓘ नृत्य                                               

नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाज

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात, पैनगंगेच्या परिसरात निसर्गरम्य अशा घनदाट जंगलात आणि गिरीकुहरातून आदिवासींची वस्ती पहायला मिळते. आदिवासी जमातीपैकी गोंड, आंध, पारधी, फासेपारधी,भिल्ल, कोलाम, कोमा, थोटी यांचे तांडे आणि खेडी मोठ्या प्रमाणात आढळतात.या जमातीच्या भाषेवर मराठी आणि तेलुगू भाषेचा काही प्रमाणात प्रभाव असला तरी त्यांच्या मूळच्या भाषाच अजूनही बोलल्या जातात.

                                               

बुद्ध गाथा

भगवान बुद्धांच्या पवित्र मुखातून वेगवेगळ्या प्रसंगी सुखदायी गाथा,ज्या लहान परंतु अत्यंत गहन मनात खोल पर्यंत रुजणाऱ्या आहेत या काही गाथा ऐकून अनेक भिकू अरहंत पदाला पोहचले अशी अफाट शक्ती या गाथान मध्ये आहे. अश्या पवित्र गाथा त्रिपिटक या ग्रंथात हजारो वर्ष जतन करण्यात आल्या आहेत पाली भाषेतील गाथा अनेक देश्यानी त्यांच्या भाषेत भाष्यातरित करून समग्र विकास साधला आहे. कम्बोडिया,श्रीलंका,थायलंड ब्रह्मदेश,व्हिएतनाम,लाओस असे अनेक लहान देश बौद्ध संस्कृती मुळे सांस्कृतिक दृष्ट्या खूप विशाल आहेत.

                                               

लाठमार होली

लाठमार होली हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यात साजरा होणारा होळी उत्सव आहे. मथुरा, वृंदावन या कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या उत्सवाचे विशेष महत्व आहे.

नृत्य
                                     

ⓘ नृत्य

नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. नृत्यातून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो.

फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, लिखाण यांप्रमाणेच नृत्य, हा छंद केवळ एक आवड म्हणून जोपासता व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडता येतो.या क्षेत्रात मध्ये लोकांने भरपूर नाव कमवले आहे व ते सफल सुद्धा झालेल आहे.

                                     

1. पार्श्वभूमी

भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्य कलेला फार मोठी परंपरा लाभली आहे.भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र असले तरी प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती, परंपरा, लोककला, सामाजिकता यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. देव देवतांपासून, पुराण कथेतून तसेच हजारो वर्षापासून स्त्री पुरुषांच्या भावभानांचे कलात्मक प्रकटीकरणाच्या सृजनशीलतेची नृत्य ही शक्ती आहे.

नृत्यात करियर करू इच्छिणाऱ्याला नृत्याचा इतिहास व व्यावसायिक पार्श्वभूमी माहीत असावी लागते. नृत्य ही ललित कला आहे. नृत्य म्हणजे नाचणे, या धातूवरून नृत्य, नृत, नर्तन इ. शब्द बनले आहेत. या नृत्याच्या अनेकांनी अनेक व्याख्या दिल्या आहते. अभिनय दर्पण ग्रंथातील एक व्याख्या नेहमी उद्धृत केली जाते.

रसभाव व्यंजादियुतं नृत्यभितीर्यते।

                                     

2. भारतीय नृत्यशैली

नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत.दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत यातील कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत. तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.

                                     

2.1. भारतीय नृत्यशैली भरतनाट्यम

 • यात कर्नाटक संगीत असते.
 • संस्कृत, कन्नड, तेलुगू, तमिळ या भाषांमध्ये नृत्य रचना आढळतात.
 • ही सर्वात प्राचीन नृत्य शैली असून तिचा उगम तामिळनाडू येथील तंजावूर प्रांतात झाला.
 • दैवत- शिव,विष्णू, मुरुगन, गणेश, देवी.
 • रचना-पुष्पांजली, अलारिपू,जतीस्वरम, कौतुकम, शब्दम, वर्णम, अभिनय पदम, तिल्लाना, मंगलम
 • वाद्य- मृदंग, घटम, खंजिरा, मोरसिंग, बासरी, व्हायोलीन, तालम आणि वीणा.
 • एकल शैली असून स्त्री किंवा पुरुष दोघेही नाचू शकतात. हल्ली सांघिक रचनाही असतात.
 • या शैलीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे.
 • ग्रंथ- नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण.
                                     

2.2. भारतीय नृत्यशैली कथक

 • हिंदुस्थानी संगीताचा वापर
 • हिंदी, ब्रिज, भोजपुरी,उ र्दू भाषांमध्ये रचना असतात.
 • मोगल संस्कृतीचा प्रभाव
 • दैवत- कृष्ण, शिव.
 • उत्तर भारतात उदयास आलेली शैली.बनारस,जयपूर लखनौ येथे विस्तार.
 • रचना - वंदना, सलामी, थाट, परण, अभिनय पक्ष.
 • ग्रंथ - नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण
 • वाद्य - बासरी, तबला, पेटी, पखवाज, सारंगी.
 • एकल शैली असून स्त्री आणि पुरुष दोघेही नृत्य करतात. हल्ली सांघिक रचनाही असतात.
                                     

2.3. भारतीय नृत्यशैली कथकली

 • दैवत - रामायण, महाभारतातील पात्र आणि भास, कालिदासाची नाटके
 • वाद्य - चेंगला, मद्दल, चेंडा, एल्लतालम
 • ग्रंथ- हस्तलक्षण दीपिका
 • कर्नाटक सोपनम संगीत
 • केरळची वैशिष्ट्यपूर्ण शैली
 • भाषा -मल्याळम, संस्कृत
 • आर्य आणि द्रविड संस्कृतीचा प्रभाव
 • समूह शैली आणि फक्त पुरुष कलाकार
 • रचना - श्लोक, पदम, कलाझीम
                                     

2.4. भारतीय नृत्यशैली मणिपुरी नृत्य

 • रचना - रासलीला
 • दैवत- कृष्ण
 • भाषा -मणिपुरी
 • समूह शैली
 • वैष्णव संप्रदायाचा प्रभाव.
 • वाद्य - ढोलक, बासुरी, शंख, झांजा, तंबोरा, पुंग
 • ग्रंथ- गोविंद संगीत, लीला विलास.
 • मणिपूर, आसाम, बंगाल, त्रिपुरा या ईशान्य भारतातील शैली.
                                     

3. भारतातील राज्यानुसार नृत्यप्रकार

 • पंजाब -भांगडा, गिद्धागिद्दा
 • उत्तरांचल -पांडव नृत्य
 • मध्य प्रदेश -कर्मा, चरकुला
 • आसाम -बिहू, जुमर नाच
 • केरळ -कथकली
 • मिझोरम -खान्तुम
 • बिहार -छाऊ
 • गोवा -मंडो
 • छत्तीसगढ -पंथी
 • उत्तराखंड -गढवाली
 • पश्चिम बंगाल -गंभीरा, छाऊ
 • मणिपूर -मणिपुरी
 • मेघालय -लाहो
 • झारखंड -कर्मा, छाऊ
 • गुजरात -गरबा, रास
 • तामिळनाडू -भरतनाट्यम
 • ओरिसा -ओडिसी, छाऊ
 • कर्नाटक -यक्षगान, हत्तारी
 • महाराष्ट्र - लावणी
 • उत्तर प्रदेश -कथक, चरकुला
 • राजस्थान -घूमर
 • जम्मू आणि काश्मीर -रौफ
 • आंध्र प्रदेश -कुचीपुडी, कोल्लतम
 • अरुणाचल प्रदेश -बार्दो छम
                                     

4. नृत्यासाठी लागणारे पोशाख आणि दागिने

नृत्यशैलींशी संबंधित विशेष पोशाखांची, फुलाच्या गजऱ्यांची व दागिन्यांची आवश्यकता असते. त्यासाठी पुणे-मुंबईत खास दुकाने आहेत. पुण्यातली अशी काही दुकाने:-

 • नृत्यभूषा धायरी-पुणे, संचालक - नीलिमा हिरवे: या दुकानात भरतनाट्यम, कथक, ओडिसीसह सहा नृत्यशैलींशी संबंधित वस्त्रे मिळतात. त्यांत निळा, लाल, हिरवा यांसह विविध रंगांतील जवळपास १०० घागरे, मोत्याचे आणि सोन्याचे दागिने, त्यातही नेकलेस आणि डूल यांच्यासहित वेल, कंबरपट्टा, गजरे यांचा समावेश आहे.
 • नृत्यारंभ स्टोअर
 • आभूषा टिळक रोडजवळील विजयनगर कॉलनी-पुणे, संचालक - सई परांजपे: स्थापना २९ एप्रिल, २००८. या दुकानात मंचाच्या सुशोभनाचे साहित्य, गाताना मांडीवर घ्यायच्या शाली, झब्बे यांपासून सर्व नृत्य-संगीत वस्त्रसामग्री मिळते.
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →