Back

ⓘ नटरंग (चित्रपट)



नटरंग (चित्रपट)
                                     

ⓘ नटरंग (चित्रपट)

नटरंग हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, प्रिया बेर्डे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ जानेवारी २०१० रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे.

                                     

1. कथानक

या चित्रपटात चाकोरीबाहेर विचार करणाऱ्या एका सृजनशील माणसाची संघर्ष-कथा मांडलेली आहे. एक तरुण पहिलवान गुनवंतराव कागलकर उर्फ़ गुणा अतुल कुलकर्णी याला तमाशामध्ये राजाची मध्यवर्ती भूमिका करायची मनापासून इच्छा असते. ती न मिळाल्याने शेवटी तो स्वतःच तमाशाचा फड काढतो. आणि पुढे.

स्रोत

या चित्रपटाची कथा आनंद यादव यांच्या नटरंग या कादंबरीवर आधारलेली आहे.

                                     

2. कलाकार

  • प्रिया बेर्डे.
  • विभावरी देशपांडे.द्वारका कागलकर
  • सोनाली कुलकर्णी.नयना कोल्हापूरकर
  • किशोर कदम.पांडोबा
  • अतुल कुलकर्णी. गुनवंतराव कागलकर उर्फ़ गुणा
                                     

3. दिग्दर्शकाविषयी

रवी जाधव जन्म: १९७१ यांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्‌समधून कला शाखेची पदवी घेतलेली आहे. त्यांनी अनेक भाषांमधील जाहिरात क्षेत्रात कला-दिग्दर्शक म्हणून काम केलेले आहे. त्यांना जाहिरात क्षेत्रातील कामाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. नटरंग हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होत.

                                     

4. संगीत

या चित्रपटाचे संगीत ही सर्वात जमेची बाजू आहे. आजच्या काळातले आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाची कथा / पटकथा मुख्यत्वे लोककला आणि लोकसंगीत तमाशा यावर आधारलेली असल्यामुळे त्या अनुषंगाने संगीत रचण्यात आलेले आहे. पिंजरा नंतर मराठीमधला हा एक महत्त्वाचा तमाशावर आधारित संगीत असलेला हा चित्रपट आहे. नटरंग चे संगीत बरेच गाजले.

                                     

5. समीक्षा

हा चित्रपट मामि मुंबई अकादमी ऑफ मूव्हिंग इमेजमध्ये प्रदर्शनापूर्वी दाखवला गेला. या चित्रपटाला चित्रपट रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत असतानाच या चित्रपटाने परत एकदा जादू करून दाखवली व मोठी कमाई केली.

                                     

6. बाह्य दुवे

  • सकाळ विदागारातील आवृत्ती
  • महाराष्ट्र टाइम्स
  • फेसबुक अल्बम
  • बीगोये
  • ई-सकाळ
  • डी एन ए न्यूज
  • नटरंगचे अधिकृत संकेतस्थळ विदागारातील आवृत्ती
  • लोकसत्ता
  • टाइम्स ऑफ इंडिया
  • मराठी मूवी वर्ल्ड
  • फेसबुक ग्रुप
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →