Back

ⓘ कथक



कथक
                                     

ⓘ कथक

कथक किंवा कथ्थक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे.

कथ्थक हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकार असून भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्त्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे. शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत, तोडे, नायक नायिका भेद, तत्कार, घुंगुरांचा आवाज, तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो. या गोष्टीमुळे लोकरंजनही होते.

                                     

1. कथक शब्दाचे अर्थ

कथक ह्या शब्दाचा व्युत्पत्ती कथा कहे सो कथक अशी सांगितली जाते. म्हणजेच हावभाव आणि हाताच्या व पायाच्या हालचाली वापरून कथा सांगणाऱ्या व्यक्तींपासून कथक हा शब्द आला असे म्हणले जाते. याचाच दुसरा अर्थ कथा सांगणारी शैली म्हणजे कथक असा होतो.

ब्रह्म पुराणामध्ये अभिनेता, गायक, नर्तक यांना कथक असे संबोधले आहे. पाली भाषेमध्ये कथको याचा अर्थ उपदेशक असा आहे. नेपाळी भाषेत कथिको असा शब्द व्याख्याता या अर्थी दिसून येतो. संगीत रत्नाकर या ग्रंथाच्या नृत्याध्यायामधे कथक हा शब्द आला आहे.

                                     

2. इतिहास

कथावाचन करणाऱ्यांकडून मंदिरांमधे पौराणिक कथा सांगितल्या जात. त्यानंतर होणाऱ्या कीर्तनात नट मंडळी नृत्य करीत असत. काही सामाजिक कारणांमुळे या नटमंडळींवर तत्कालीन परिस्थितीत बहिष्कार टाकला गेला, त्यामुळे यांनी स्वतःच कथा सांगून नृत्य करण्यास प्रारंभ केला, म्हणून त्यांना कत्थक असे संबोधण्यात येऊ लागले. आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली या नटमंडळींनी नृत्याची शास्त्रीय पद्धती व परिभाषा आत्मसात केली आणि नृत्यप्रधान अंगाने त्यांनी कृष्णाच्या लीलांचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली, आणि कथक नृत्यशैलीचा जन्म झाला.

                                     

3. घराणे परंपरा

कथकची तीन प्रमुख घराणी आहेत -

१. जयपूर घराणे - भानुजी हे मुख्य प्रवर्तक. याच्या चार शाखांचे नायक नत्थूलाल, शंकरलाल, गिरिधारीलाल व भानजी. हे अन्य प्रवर्तक होत.

२. लखनौ घराणे - प्रवर्तक: ईश्वरीप्रसाद.

३. बनारस घराणे - प्रवर्तक: जानकीप्रसाद

४. रायगड घराणे - हे फारसे प्रचलित नाही.

इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांच्या तुलनेत कथकमध्ये पाय ताठ ठेवले जातात. हा कथकवरील मोगल प्रभावामुळे झालेला बदल आहे असे मानले जाते.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →