Back

ⓘ हडप्पा संस्कृती                                               

सावळदा संस्कृती

सावळदा हे एक धुळे गाव आहे.ते तापी नदीवर आहे. सावळदा संस्कृतीचा काळ इसवी सनापुर्वी सुमारे २००० - १८०० असा होता.या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातील मध्याशमायुगीन लोकांचा सौराष्ट्र मधील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झाला असावा दायमाबाद येथील सावळदा संस्कृतीचे लोक चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत होते.त्यावरील नक्षीमध्ये तीराग्रे,माशांचे गळ आणि विविध प्राणी यांच्या आकृतींचा समावेश होता.त्याखेरीज तांब्याच्या वस्तू,गारगोटी वर्गातल्या खड्यांचे मणी, हाडांनपासून बनविलेले तीराग्रे,दगडी पा - वरवंटे इत्यादी वस्तू त्यांच्या वापरात होत्या.त्यांच्या गाव - वसाहतीभोवती तटबंदी बांधलेली ...

हडप्पा संस्कृती
                                     

ⓘ हडप्पा संस्कृती

हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्वज्ञानी येथे उत्खनन केले. हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती या नावाने ओळखले जाते. हडप्पापूर्व् काळातील रावी अथवा हाक्रा संस्कृतीचे अवशेष हडप्पा, कुणाल, भिराणा, फर्माना इत्यादी स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत.

उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.

                                     

1. नगररचना

हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते. प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या अगदी विरुद्ध हडप्पामध्ये कोणतीही भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे नव्हती. असे कोणतेही पुरावे मिळाले नाही.

                                     

2. आर्थिक व्यवस्था

व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन - उदाहरणार्थ,सुबक मातीची भांडी,सोने, चांदी,तांबे आणि कांसे या धातूंच्या वस्तू,सौंदर्यपूर्ण वस्तू,मूर्ती इत्यादी. उत्पादनाच्या सोईसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तींचा स्वतंत्र विभाग.अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार. शासकीय यंत्रणेच्या साहाय्याने व्यापारावर नियंत्रण असे.

हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती. शहरचा लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता. नगर बांधणीसाठीच्या विटा ४:२:१लांबी:रुंदी:उंची या प्रमाणातच असत.

                                     

3. घरे

हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात २० ते ३० घरे असत. ती पक्क्या विटांची असून प्रशस्त होती. प्रत्येक घरामध्ये स्नानगृहबाथरूम असे. काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत. घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते, तसे.अंगण असे. घरे एक किंवा दोन मजली असत. फारच क्वचित याहून अधिक मजले असत. मोहेंजोदडो व हडप्पा या दोन्ही शहरात दगडांचे बांधकाम आढळले नाही. कोणत्याही घराच्या रस्त्याच्या बाजूला खिडक्या व प्रवेशद्वारे नाहीत. रस्त्यावरील धुळीपासून व चोराचिलटांपासून बचाव व्हावा, हा हेतू त्यामागे दिसतो. प्रत्येक घर शेजारच्या घरापासून अलग असे. रस्त्याच्या बाजूला मोरी व तिला लागून स्नानगृह बांधीत. मोरी व स्नानगृहात कोठे पाणी मुरणार नाही याची काळजी घेत. आणि पाणी बदलण्याची सोय केेलेेली होती

                                     

4. तटबंदी

हडप्पाकालीन नगरांना संरक्षक तटबंदी असे. तटबंदी रुंद असून तिचे बांधकाम पक्क्या विटांचे असे. तटबंदीला बुरूज होते. यावरून हडप्पा संस्कृतीने नगराच्या संरक्षणाकडे लक्ष दिल्याचे दिसते.

                                     

5. रस्ते

शहराच्या प्रभागाकडून जाणारे रस्ते मुख्य रस्त्यांना जोडलेले असत. रस्ते पुरेसे रुंद असून ते एकमेकांना काटकोनांत छेदणारे होते. रस्त्यांच्या कडेला सापडलेल्या लाकडांच्या अवशेषांवरून रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय असावी असे दिसते.

                                     

6. सांडपाण्याची व्यवस्था

हडप्पा संस्कृतीत सांडपाणी व पावसाचे पाणी गावाबाहेर वाहून नेण्यासाठी एक मीटर खोल भुयारी गटारांची व्यवस्था होती. ही गटारे दगड व पक्क्या विटांनी बांधलेली होती. कोणत्याही समकालीन संस्कृतीमध्ये न आढळणारी सांडपाण्याची व्यवस्था हडप्पा संस्कृतीत पाहावयास मिळते.

                                     

7. महास्नानगृह व जहाजाची गोदी

हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती. मोहनजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. स्नानगृहाचे वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती. यावरून हडप्पा संस्कृतीतील लोक आरोग्याबाबत किती दक्ष होते हे दिसून येते.

लोथल येथील उत्खननामध्ये एका प्रचंड गोदीचे अवशेष सापडले. या गोदीची लांबी २७० मीटर तर रुंदी ३७ मीटर आहे. या गोदीवरून जहाजबांधणी, व्यापार, व्यापारीमार्ग यांची माहिती या संस्कृतीमधील लोकांना होती असे दिसून येते. येथे सापडलेल्या एका मुद्रेवर जहाजाचे चित्र कोरले आहे. तसेच लोथल येथे पक्क्या विटांनी बांधलेली धान्य कोठारे सापडली आहेत. यावरून कृषी व व्यापार क्षेत्रातील त्यांची प्रगती लक्षात येते.

                                     

8. समाजरचना

हडप्पा संस्कृतीत कुटुंबसंस्था महत्त्वाची होती. नगररचनेच्या अवशेषांवरून समाजात राज्यकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते. नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झालेली असल्याने शेती हा समाज जीवनाचा कणा होता.

                                     

9. वेशभूषा-केशभूषा

हडप्पा संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांवर मिळालेले कापडाचे ठसे, मृण्मयमूर्तीवर दाखवलेले वस्त्र, उत्खननात मिळालेल्या विविध आकारांच्या सुया यावरून लोकांना वेशभूषेचे चांगले ज्ञान असल्याचे दिसते. तसेच तत्कालीन मूर्तींवरून केशभूषेची माहिती मिळते. पुरुष दाढी कोरत, मधोमध भांग पाडत तर स्त्रिया विविध प्रकारची केशरचना करत असत.पुरुष डाव्या खांद्यावरुन शाल पांघरीत व उजवा हात मोकळा ठेवत.कमरेच्या खाली ते धोतर घालत.स्त्रिया कमरेपासून गुडघ्यापर्यंत घागरा व वरती ओढणी सारखे एखादे वस्त्र घालत.

                                     

10. सौंदर्यप्रसाधने

हडप्पाकालीन संस्कृतीच्या उत्खननात एक शृंगारपेटी मिळाली. यामध्ये काशाचे आरसे, हस्तिदंती कंगवे, केसासाठी आकडे, पिना, ओठ व भुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगाच्या कांड्या मिळाल्या. हडप्पाकालीन लोकांना सौंदर्यप्रसाधनांप्रमाणेच अलंकाराची आवड होती. उत्खननामध्ये मण्यांचे व सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या, वाक्या, कमरपट्टा इत्यादी अलंकार मिळाले तसेच नर्तकीचा ब्राँझचा पुतळा मिळाला. तिच्याही हातात बांगड्या व गळ्यात हार आहे.

                                     

11. करमणुकीची साधने

हडप्पाकालीन लोकांची सोंगट्या, फासे ही करमणुकीची साधने होती. नृत्य, गायन, शिकार व प्राण्यांच्या झुंजी इत्यादींमधून करमणूक केली जाई. लहान मुलांसाठी भाजक्या मातीची सुबक खेळणी बनवली जात. डोक्याची पुढेमागे हालचाल करू शकणारा बैल, बैलगाडी, पक्ष्यांच्या अाकाराच्या शिट्या, खुळखुळे इत्यादींचा यात समावेश होतो.

                                     

12. धर्मकल्पना

हडप्पा संस्कृतीत उत्खननात सापडलेल्या विविध मुद्रा, मूर्ती, अग्निकुंड, मृतांना पुरण्याची पद्धत यावरून त्यांच्या धार्मिक कल्पनेची माहिती मिळते. लोकांची प्रामुख्याने शेतीवरती उपजीविका असल्याने लोक भूमातेस मातृदेवता मानत. त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्गशक्तीस महत्त्वाचे स्थान होते. सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत. कालिबंगन येथे सापडलेल्या अग्निकुंडावरून ते अग्निपूजा करत असल्याचे दिसते. निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती, नाग, वृषभ म्हणजे बैल यांचीही ते पूजा करत होते. लोक मूर्तिपूजक होते, मात्र हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळली नाहीत.

तेथील लोक मृतदेहाचे विधिपूर्वक दफन करत. दफन करते वेळी त्यांचे सोबत अलंकार व भांडी ठेवली जात.

अंतविधी संस्कार:पूर्णसमाधी,आंशिकसमाधी,दाहकर्म.

                                     

13. आहार

तेथील लोकांचा प्रमुख आहार गहू होता. त्याचबरोबर जवस, तीळ, वाटाणा, यासारखी दुय्यम धान्ये सुद्धा पिकवीत असत. खजुराचा उपयोगही ते अन्न म्हणून करीत असत. येथील लोक पशू बाळगीत त्यामुळे दूधदुभत्यांचा पुरवठा त्यांच्याकडे होत असावा. तसेच मांसाहारही केला जात असे.

.

                                     

14. वजन आणि मापे

येथील लोक अनेक प्रकारच्या वजनांचा उपयोग करीत. त्यांत दोराने उचलण्याच्या वजनापासून ते सोनाराने उपयोगात आणलेल्या लहानशा वजनापर्यंतचा समावेश होता.

वजन माप हे 16 च्या पटितील होते.

0.8565 हे वजन कमीत कमी होते व 274.938 हे जास्तीत जास्त होते.

                                     

15. घरगुती उपकरणे

कुंभाराच्या चाकावर बनवलेली सुंदर मातीची भांडी येथे आढळली. त्यांवर नक्षीकाम केलेले होते. याशिवाय तांबे, ब्रांझ आणि चांदीची भांडी सापडली, परंतु याचे प्रमाण मात्र अत्यल्प होते.

                                     

16. हडप्पा संस्कृतीचा विनाश

या संस्कृतीच्या विनाशाची अनेक कारणे सांगितली जातात. १) नैसर्गिक संकटामुळे -

  • जमिनीची सुपिकता घटली
  • हवामानात होणारा बदल
  • नदीला आलेला पूर/अतिवृष्टी
  • भूकंप
  • थर वाळवंट विस्तारल्याने सरस्वती नदी लुप्त होणे

२) बाह्य आक्रमणे -

  • आर्यांचे आक्रमण
  • युयुत्सु लोकांचे आक्रमण

३) तंत्रज्ञानावरील मक्तेदारी संपली. ४) राजकीय विघटनामुळे नाश ५) आर्थिक विघटनामुळे नाश ६) कायदा व सुव्यवस्था नसावी.

                                     

17. अलीकडील संशोधन

पुणे डेक्कन कॉलेज, खरगपूर येथील इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी व इतर संस्थांनी २०१६ साली केलेल्या एका नव्या संशोधनातून प्राचीन सिंधू संस्कृती ही ५५०० वर्षांपूर्वीची नसून ८००० वर्षांपूर्वीची असल्याचे निष्कर्ष काढले गेले आहेत.‘नेचर’ या विज्ञानसंशोधनविषयक नियतकालिकाच्या एप्रिल २०१६ च्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. २०१४ मध्ये तामिळनाडुतील शिवगंगा जिल्‍ह्यातील पल्‍लीसंथाई थिडल या गावात जमिनीखाली गाडले गेलेले हडप्‍पा संस्‍कृतीसारखे अवशेष आढळून आले आहेत. बंगळूरू येथील पुरात्‍तव विभागाच्‍या संशोधकांनी याचा शोध लावला आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →