Back

ⓘ शिल्पकलाशिल्पकला
                                     

ⓘ शिल्पकला

शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस शिल्प असे म्हणतात. मूर्ती, पुतळे तसेच रचनात्मक आकृतिबंध अशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.

संस्कृत साहित्यात मूर्तिकलेचे शास्त्र विकसित झालेले आढळते. मानसार नावाच्या ग्रंथात शिल्पलक्षण नावाचे एक प्रकरण आहे. त्यात मूर्तिकलेविषयी अधिक माहिती दिलेली आहे. भारताच्या स्थापत्य, शिल्पकला, कला आणि हस्तकलेची मुळे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात खोलवर दिसते. भारतीय शिल्पकलेने सुरुवातीपासूनच एक वास्तववादी रूप धारण केले आहे, ज्यात मानवी व्यक्तिरेखा बहुतेक वेळा पातळ कमर, लवचिक अवयव आणि एक तरूण आणि संवेदनशील रूप दर्शवते. भारतीय शिल्पांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांपासून बनवलेल्या असंख्य देवतांचे चित्रण करण्यात आले आहे.

सिंधू खोरे सभ्यता भारतातील मोहेंजोदरोचे मोठे जलसाठा प्राचीन शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. दक्षिणेकडील कांचीपुरम, मदुरै, श्रीरंगम आणि रामेश्वरम आणि उत्तरेकडील वाराणसीची मंदिरे ही मंदिरे ही भारतातील भरभराट झालेल्या कलेचे एक प्रसिद्ध उदाहरण आहे.

इतकेच नाही तर मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर आणि ओरिसाच्या सूर्यमंदिरातही या नितांत कलेचा जिवंत देखावा आहे. सांची स्तूप शिल्पसुद्धा अतिशय भव्य आहे जे ईसापूर्व तिसर्‍या शतकातील आहे. तसेच सभोवतालची जंगले बलसट्रेड्स आणि तोरणांचे दरवाजे सुशोभित करीत आहे. ममल्लापुरमचे मंदिर; सारनाथ संग्रहालयाची लायन कॅपिटल जिथून भारताच्या अधिकृत सीलला अभिवादन करण्यात आले होते ही मोरयाची मूर्ती आहे, अमरावती महात्मा बुद्धांच्या जीवनातील घटना आणि नागार्जुनघोंडाच्या स्थापत्य शिल्पांचे वर्णन करणारे इतर उदाहरण आहेत.

मुंबईच्या जवळ असलेल्या एलिफंटा लेण्यांमध्ये हिंदू गुहेच्या स्थापत्य वास्तूचा कळस दिसतो आणि त्याचप्रमाणे एलोराच्या हिंदू आणि जैन खडकांच्या मंदिरांमध्ये, विशेषत: आठव्या शतकातील कैलास मंदिरही या वास्तुकलेच्या रूपात पाहिले जाऊ शकते.

                                     

1. भारतातील प्राचीन शिल्पकला/मूर्तीकला

भारतातील एखाद्या प्राचीन देवदेवतांच्या मूर्तीत अनेक आयुधे, अलंकार इत्यादी असतात. ते कोरण्याच्या शैलीवरुन ती मूर्ती कोणत्या कालखंडातील आहे हे ओळखता येते. अशी प्रतिमा अथवा मूर्ती कोरतांना ती सौंदर्यपूर्ण, लयबद्ध कशी होईल याचाही ती मूर्ती घडविणारा कलाकार विचार करतो. मूर्ती बहुदा एकसंध पाषाणातूनच कोरली जाते. त्यासमवेतच त्या मूर्तीतील आयुधे, अलंकार देखील कोरल्या जातात. पण ते इतके अप्रतिम असतात कि ते मूर्तीसमवेतच कोरले असे बघणाऱ्याला जाणवत नाही. ते अलंकार/आयुधे ही मूर्ती कोरल्यावर घातल्या गेलीत असे वाटते. मध्ययुगीन काळात विशेषतः शिवकाळात कसबा गणपती मंदिर जीर्णोद्धार, लाल महाल उभारणी राजगड व रायगडावरील बांधकामे जलदुर्गांची उभारणी या प्रकारचे स्थापत्य उभारण्याचे उल्लेख इतिहासामध्ये आहेत हिरोजी इंदुलकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला गाव वसवताना शक्यतो काटकोनात तील रस्ते कडेला दगडी बांधकाम व नदीपात्राच्या कडेला घाट अशी रचना केली जात असे पेशवेकाळात अहमदनगर विजापूर सारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली पेशव्यांनी भूमिगत छोटी छोटी धरणे बाग-बगीचे हाऊद कारंजी उभारले पुणे शहराच्या जवळील हडपसर भागातील दिवेघाटातील मस्तानी तलाव स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे पुण्यातील शनिवार वाडा विश्रामबागवाडा नाशिकचा सरकार वाडा कोपरगावचा रघुनाथ पेशव्यांचा वाडा सातारकर छत्रपतींची वाडे याशिवाय वाई मेनवली टोके श्रीगोंदे पंढरपूर येथील जुने वाडे मध्ययुगीन वाडा संस्कृतीची चिंता आहेत या बांधकामात विटा वापरल्या जात लाकडी खांब तुळ्या पाठ घडीव दगड कमानी उत्तम घोटलेले चुना नळीच्या कौलांचे छप्पर चिखल व बांबू यांचा वापर बांधकामात केला जात असे वाड्यांच्या सजावटीसाठी चित्रकाम रंग काम काष्ठशिल्प आरसे याचा वापर केला जात असे मध्ययुगीन काळातील शिल्पकलेला एक वेगळे वैशिष्ट्य व स्थान मिळाले शिवकाळ ते पेशवाई काळ याकाळात वैशिष्ट्यपूर्ण शिल्प शैली बहरली

                                     

2. आयुधे व उपकरणे

मूर्त्यांनी धारण केलेली आयुधे व उपकरणे खालील प्रकारची असू शकतात.

                                     

3. मुद्रा

हाताचा तळवा व बोटे यांच्या सहाय्याने तयार केलेल्या विविध मुद्रा.प्राचीन शास्त्रात याचाही सखोल विचार केल्या गेला आहे.त्या मुद्रा खालील प्रकारे असू शकतात.

  • अभय
  • तर्पण
  • अंजली
  • अर्धचंद्रहस्त
  • वरद
  • नमस्कार
  • तर्जनी
  • भूस्पर्श
  • ज्ञानमुद्रा

इत्यादी.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →