ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 227



                                               

सदाशिव शिवदे

डॉ. सदाशिव सखाराम शिवदे हे ऐतिहासिक विषयांवर लेखन करणारे मराठी साहित्यिक होते. डॉ. शिवदे हे व्यवसायाने पशुवैद्यक होते. इतिहासाच्या आवडीमुळे ते या क्षेत्रातील अभ्यासाकडे वळले. पशुवैद्यक सेवा पुरवितानाच त्यांनी मराठी, इतिहास विषयात एम. ए. ची पदवी घ ...

                                               

शिवराम एकनाथ भारदे

शिवराम एकनाथ भारदे ऊर्फ भारद्वाज हे संत साहित्यावर साधक बाधक टीका करणारे मराठीतले एक चिकित्सक लेखक होते. त्यांचा जन्म ९ मे १८६२चा. ३ फेब्रुवारी १९२० रोजी ते निधन पावले. त्यांचे घराणे हरिदासाचे होते. स्वत: शिवरामबुवाही कीर्तनकार होते. बी.ए. झालेले ...

                                               

उद्धव शेळके

उद्धव ज. शेळके हे मराठी भाषेतील कादंबरीकार आहेत. त्यांची धग ही कादंबरी विशेष गाजली होती. उद्धव ज. शेळके हे अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यांनी लिहिलेली धग ही कादंबरी ग्रामीण पार्श्वभूमीवरील असून इ.स. १९९०च्या दशकात या कादंबरीचे नागपूर आकाशवाणी केंद ...

                                               

सच्चिदानंद शेवडे

डॉ. सच्चिदानंद शेवडे हे मराठी लेखक, व्याख्याते, चरित्रकार आणि इतिहासकार आहेत. त्यांनी Historical and Cultural Studies of Kashmir या विषयावर डॉक्टरेट प्राप्त केली आहे.

                                               

शैलजा रानडे

प्रा. डाॅ. शैलजा मधुकर रानडे या एक मराठी लेखिका आहेत. त्या यवतमाळला राहतात.तेथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात त्या संस्कृतच्या अधिव्याख्यात्या आहेत. त्यांची काही पुस्तके संस्कृत साहित्यावर व व्याकरणावर आहेत.

                                               

रवींद्र शोभणे

डॉ. रवींद्र केशवराव शोभणे हे एक मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत. श्री.ना. पेंडसे यांचे साहित्य हा शोभणे यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता. शोभणे हे अपूर्वाई नावाच्या दिवाळी अंकाचे सहसंपादक आहेत.

                                               

श्याम पेठकर

श्याम पेठकर हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी जगदीश कदम यांची निर्मिती असलेल्या दोन लघुपटांचे लेखन केले आहे चित्रपट निर्माते आशिष उबाळे यांच्या" गार्गी’ चित्रपटाचे संवादलेखन पेठकरांचे आहे. पेठकरांच्या कथेवर जगदीश कदम यांनी दोन लघुपट केले आहेत. श्याम ...

                                               

श्री.ग. माजगावकर

श्री.ग. माजगांवकर - श्रीकान्त माजगावकर हे एक पत्रकार, लेखक, प्रकाशक आणि, माणूस या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक. ते ’माणूसकार श्रीगमा’ या नावाने प्रसिद्ध होते. राजहंस प्रकाशन ही त्यांची मराठी पुस्तक प्रकाशन संस्था. जन्म - ०१ अगस्त १९२९ आषाढ कृष्ण ...

                                               

श्री.ज. जोशी

पाढरपेशांचे जग धूमकेतू संपूर्ण श्रीकृष्ण कथा साळसूद अनुभव चार्वाक समिधा प्रकाशाची सावली पाप आनंदी गोपाळ मामाचा वाडा डेड एन्ड थोडं माझं पण. मृगजळ. या पुस्तकाचे वि.ग. कानिटकर यांचे वृत्तपत्रात छापलेले परीक्षण, त्यांच्या अभिप्राय या पुस्तकात आले आहे ...

                                               

श्रीकांत उमरीकर

ते शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटना या संस्थेचे सन्माननीय सदस्य आहेत. संस्थेच्या ई-नियतकालिकात त्यांचे लेख छापून येत असतात. श्रीकांत उमरीकर यांचे साहित्यविषक लेखन मराठी दैनिकांमध्ये छापून येत असते. श्रीकांत उमरीकर हे ’ग्रंथसखा’ या मास ...

                                               

श्रीकांत कार्लेकर

प्रा. डॉ. श्रीकांत कार्लेकर हे मराठी लेखक आहेत. ते विज्ञान, भूगोल, पर्यावरण आदी विषयांसह ललित लेखनही करतात. विविध नियतकालिकांमध्ये कार्लेकरांचे भौगोलिक विषयांवरचे लेख प्रकाशित झाले आहेत. भारतीय मान्सूनची ओळख करून देणारा ‘अचंबित करणारी सूत्रबद्ध य ...

                                               

श्रीकांत देशमुख

श्रीकांत साहेबराव देशमुख हे मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहेत. त्यांचा जन्म ३ जुलै, १९६३ मध्ये मौजे राहेरी बु. ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे झाला. मुळचे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी बुद्रुकचे असून सद्या ते नांदेडला स ...

                                               

श्रीकांत बोजेवार

श्रीकांत बोजेवार हे एक मराठी लेखक आहेत, आणि सध्या दैनिक लोकसत्ताचे मुंबईतील निवासी संपादक आहेत. तंबी दुराई या टोपणनावाने ते रविवारच्या लोकसत्तेत ’दोन फुल एक हाफ’ हे सदर सतत १२ हून अधिक वर्षे लिहीत आले आहेत.

                                               

श्रीकांत येळेगावकर

प्रा. डाॅ. श्रीकांत येळेगावकर हे सोलापुरात राहणारे एक मराठी लेखक आहेत. ते सोलापूर सोशल असोसिएशन ऑफ आर्ट्‌स ॲन्ड कॉमर्स कॉलजमध्‍ये १९७८ साली राज्‍यशास्‍त्राचे प्राध्‍यापक झाले. नोकरीत असतानाच त्यांनी १९८६ साली कोल्हापूर विद्यापीठातून राज्‍यशास्‍त् ...

                                               

श्रीनिवास ठाणेदार

श्रीनिवास ठाणेदार हे अमेरिकेत स्थिरावलेले एक मराठी उद्योगपती आहेत. ते मुळचे बेळगावचे राहणारे असून अमेरिकेत कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करतात. जागतिक मंदीमुळे त्यांचा व्यवसाय एकदम शून्यावर आला, पण त्यावरही मात करून श्रीनिवास ठाणेदारांनी व्यवसायात पु ...

                                               

श्रीपाद नारायण पेंडसे

पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. ...

                                               

श्रीरंग विष्णू जोशी

श्रीरंग विष्णु जोशी हे एक मराठी लघुकथालेखक व कवी आहेत. शांता शेळके यांच्या स्मरणातल्या कविता या कवितासंग्रहात श्री.वि. जोशी यांच्या आईची कविता नावाच्या कवितेचा समावेश झाला होता. शांता शेळकेंनी अन्तर्नाद मासिकातल्या एक सदरात सदर कवितेचे परीक्षण लि ...

                                               

संदीप श्रोत्री

डाॅ. संदीप श्रोत्री हे मराठीत भूगोल, प्रवास व निसर्ग आदी विषयांवर पुस्तके लिहिणारे लेखक आहेत. सातारा येथे वास्तव्य असलेले श्रोत्री व्यवसायाने शल्यचिकित्सक आहेत.

                                               

संजय संगवई

संजय व्यंकटेश संगवई हे मराठी लेखक, पत्रकार, संपादक, माध्यमतज्ज्ञ, माध्यम चिकित्सक होते. ते नर्मदा बचाव आंदोलनाचे पूर्णवेळ कार्यकर्ता आणि जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे) समन्वयक होते. मेधा पाटकर यांचे ते निकटवर्ती होते. "अभिव्यक्ती या नासिक ये ...

                                               

कांचन प्रकाश संगीत

कांचन प्रकाश संगीत ह्या आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांच्या निर्मात्या होत्या. हिंदी विषय घेऊन एम.ए. झालेल्या कांचन प्रकाश संगीत यांनी मास्टर ऑफ़ मास कम्युनिकेशन ॲन्ड जरनॅलिझम MMCJ हा अभ्यासक्रम पूर्ण केला व त्या १९७६ साली औरंगाबाद आकाशवाणीवर निवे ...

                                               

संध्या रंगारी

संध्या रंगारी या हिंगोलीतल्या काॅलेजातील एक प्राध्यापिका, लेखिका आणि मराठी कवयित्री आहेत. शाळेत असल्यापासून त्या बालकवयित्री म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या ज्या कवितांची हिंदी रूपांतरे झाली आहेत, त्यांपैकी काही ही:- औरत होने का मतलब मराठी से हिन्द ...

                                               

संभाजी कदम

प्रा. संभाजी सोमा कदम हे एक सर्जनशील कलावंत, कवी, कलाशिक्षक आणि सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांची साहित्य, चित्र, शिल्प, संगीत या कलांमध्ये विशेष गती होती. साहित्यशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, तत्त्वज्ञान इत्यादीचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ...

                                               

प्रणव सखदेव

प्रणव सखदेव हे एक मराठी लेखक, कवी, बालसाहित्यिक आणि अनुवादक आहेत. ते वृत्तपत्रीय लिखाणही करतात. त्यांचा गिरीश कुलकर्णी यांच्यावर सर्जनशील गिरीश कुलकर्णी हा दिव्य मराठीच्या ३ एप्रिल २०१२च्या अंकातला लेख प्रसिद्ध झाला होता.

                                               

सखा कलाल

सखा कलाल पूर्ण नाव: सखाराम कलाल जन्म: १० डिसेंबर १९३८; जन्म ठिकाण:रायबागजिल्हा- बेळगांव मृत्यू: १३ डिसेंबर २०१९, कोल्हापूर हे १९६० नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार होते. त्यांचे मूळ नाव सखाराम कलाल होते. सखा कलाल रायबागहूनच मॅट्रिक झाले ...

                                               

शंकर सखाराम

शंकर सखाराम पाटील हे मराठीतले एक भाषाभ्यासक लेखक व कवी होते. मराठीच्या बोलीभाषांतील अनेक ग्रामीण शब्दांची व्युत्पत्ती आणि अर्थ त्यांनी उलगडून दाखवला आहे. शंकर सखाराम यांनी महाविद्यालात असल्यापासून कथालेखनाला सुरुवात केली. त्यांना कोकणातील ग्रामीण ...

                                               

सतीश गुप्ते

सतीश गुप्ते ह्यांनी बी.काॅम. झाल्यावर ॲडव्हान्ड अकाऊंटसीचा डिप्लोमा केला, आणि ते रसेल हेक्ट फार्मा Russel Hecht Pharma या कंपनीत नोकरीला लागले. तेथे सेल्स ॲडमिन मॅनेजर झाल्यावर काही वर्षांनी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांची घरची शेती आहे. ...

                                               

सतीश साळुंके

प्रा. डाॅ. सतीश साळुंके हे एक मराठी नाटककार, पुरातत्त्त्वविशेषज्ञ आणि इतिहासलेखक आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या बीड शाखेचे ते २०१८ सालच्या ऑक्टोबरपासून अध्यक्ष आहेत.

                                               

सदानंद देशमुख

डॉ. सदानंद नामदेव देशमुख हे मराठी भाषेत लिहिणारे भारतीय कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत. त्यांच्या बारोमास या कादंबरीला भारत सरकारकडून २००४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ह्या कादंबरीवरून बारोमास नावाचा हिंदी चित्रपट बनला आहे. डॉ. देशमुख यांचा ...

                                               

मधुवंती सप्रे

मधुवंती सप्रे या एक मराठी लेखिका आणि कवी आहेत. सन २०१०पासून मधुवंती सप्रे यांच्या संपादकत्वाखाली अक्षरगंध नावाचा दिवाळी अंक निघत असतो. मधुवंती यांचे ललित साहित्य अनेक मराठी नियतकालिकांमधून नित्यशः प्रकाशित होत असते.

                                               

माधवराव सप्रे

माधवराव सप्रे हे हिंदी लेखक, विचारवंत, पत्रकार-संपादक, स्वातंत्र्यसेनानी आणि सार्वजनिक कामांसाठीच्या स्वयंसेवकांचे मार्गदर्शक होते. त्यांनी लिहिलेली एक टोकरी भर मिट्टी ही हिंदी भाषेतली पहिली लघुकथा समजली जाते. सप्रे यांचे आठवीपर्यंत शिक्षण विलासप ...

                                               

गंगाधर बाळकृष्ण सरदार

गंगाधर बाळकृष्ण सरदार - हे मराठी लेखक होते. ते काही काळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते. १९८० साली बार्शीत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

                                               

माधवी सरदेसाई

माधवी सरदेसाई या कोकणी भाषेत लिहिणार्‍या एक भारतीय लेखिका होत्या. त्या भाषाशास्त्राच्या एम.ए. पीएच.डी होत्या. त्यांच्या मंथन या लेखसंग्रहास २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी त्यांचे निधन झाले. माधवी सरदेसाई य ...

                                               

र.गो. सरदेसाई

रघुनाथ गोविंद सरदेसाई हे मराठी लेखक, पत्रकार, संपादक, कथाकार, नाट्यचित्र समीक्षक आणि क्रीडाविषयक पुस्तकांचे कर्ते होते. सरदेसाईंचे शिक्षण कोल्हापुरात झाले. शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या स्फूर्ती व चित्रमय जगत या मासिकांचे संपादक व सहसंपादक म ...

                                               

ह.वि. सरदेसाई

डॉ. हणमंत विद्याधर सरदेसाई हे मराठी डॉक्टर व लेखक होते. ते सातत्याने वृत्तपत्रांतून आरोग्यविषयीचे लेख लिहीत. ते पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजात प्राध्यापक होते.मुंबईत १९५५ साली ते एमबीबीएस आणि १९५८ मध्ये एमडी झाले. उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. ...

                                               

सरफ़राज अहमद

सरफराज अहमद महाराष्ट्रातील महत्त्वाचे इतिहास अभ्यासक आहेत. ते मध्ययुगीन इतिहासकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ५ पुस्तके लिहिली आहेत. तर काही पुस्तकाचे त्यांनी संपादन केलेले आहे. सफराज अहमद हे मराठीत लिहिणारे लेखक आहेत. मराठीशिवाय ते ...

                                               

दिलीप सरवटे

डाॅ. दिलीप सरवटे हे व्यवस्थापन या विषयावर मराठी-इंग्लिशमध्ये लिहिणारे लेखक आहेत. ते स्वत: उद्योजक, व्यवस्थापन सल्लागार व व्यवस्थापन शिक्षक आहेत. हे पुण्यातून ३२हून अधिक वर्षे स्थायिक आहेत. ते सर्टिफाईड मॅनेजमेन्ट कन्सल्टंन्ट असूसन १९९८-२००० या का ...

                                               

सलीम मुल्ला

सलीम सरदार मुल्ला हे एक बालसाहित्यकार आहेत. हे तळंदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या गावाचे आहेत. घरी दखनी बोलली जायची. आई-वडील हिंदीचे शिक्षक. मराठीवरही त्यांचे तितकेच प्रेम. हिंदी,मराठी आणि दखनीच्या देवाणघेवाणीतून सलीम मुल्लांची भाषा लुभावणार ...

                                               

रमेश सहस्रबुद्धे

रमेश सहस्रबुद्धे हे एक मराठी विज्ञानकथा लेखक होते. ते विज्ञान युग या पुण्यात प्रसिद्ध होणार्‍या मासिकाच्या सल्लागार मंडळावर होते. अनेक दिवाळी अंकांत त्यांनी लेखन केले आहे. दैनिक प्रभातच्या दिवाळी अंकात आणि प्रभातने राबविलेल्या ऑल राउंडर या उपक्रम ...

                                               

पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे

भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म १९६५ इहवादी शासन १९७२ महाराष्ट्र संस्कृती १९७९. या ग्रंथाची प्रकरणे ’वसंत’ मासिकात १९६८सालापासून ते १९७८च्या ऑक्टोबरपर्यंत क्रमशः येत होती. प्रबंध हिंदुसमाज संघटना आणि विघटना १९६७ विज्ञानप्रणीत समाजरचना १९३६ के ...

                                               

मकरंद साठे

मकरंद साठे हे एक मराठी नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक आहेत. साठे हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. असे असले तरी ते, साहित्य अकादमीच्या अनुवादित पुस्तकांच्या २०१७ सालच्या पुरस्कारांसाठीच्या निवड समितीचे सदस्य होते. भारतीय रंगभूमीवर नावीन्यपूर्ण, प्रय ...

                                               

शंकर गोविंद साठे

शंकर गोविंद साठे हे मराठीतले एक कवी, कथालेखक आणि नाटककार होते. त्यांच्या पत्नी सुधा साठे या लेखिका होत्या. सून यशोधरा साठे याही कवयित्री आहेत.

                                               

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी सातार्‍याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आल ...

                                               

आनंद साधले

आनंद साधले (मूळ नाव आत्माराम नीलकंठ साधले" हे मराठीतले एक विद्वान लेखक होते. हा जय नावाचा इतिहास ह्या युधिष्ठिराला महाभारताचा खलनायक ठरवणाऱ्या कादंबरीमुळे आनंद साधले यांना सुरुवातीला कुप्रसिद्धी, पण नंतर अमाप प्रसिद्धी मिळाली. ह्या कादंबरीचे क्रम ...

                                               

अरुण साधू

अरूण साधू हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक होते. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

                                               

रघुनाथ जगन्नाथ सामंत

रघुवीर सामंत हे मराठी लेखक, प्रकाशक व संपादक होते. यांचे मूळ नाव रघुनाथ जगन्नाथ सामंत. ‘रघुवीर सामंत’ या नावाने, तसेच ‘कुमार रघुवीर’ ह्या टोपण नावाने त्यांनी लेखन केले.

                                               

जयंत साळगांवकर

जयंत शिवराम साळगांवकर हे मराठी ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार व उद्योजक होते. हे कालनिर्णय या सुमारे नऊ भाषांतून निघणाऱ्या आणि केवळ मराठी भाषेतच ४८ लाख प्रतींचा खप असलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे संस्थापक-संपादक होते. ही दिनदर्शिका आणि पंचांग इ.स. १९ ...

                                               

जयराज साळगावकर

जयराज साळगावकर हे लेखक तसेच उद्योजक आहेत. हे कालनिर्णय या सुमारे नऊ भाषांतून निघणाऱ्या आणि केवळ मराठी भाषेतच ४८ लाख प्रतींचा खप असलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे सहसंस्थापक, सध्याचे संपादक, प्रकाशक व कार्यकारी संचालक आहेत. ही दिनदर्शिका आणि पंचांग इ. ...

                                               

आण्णासाहेब हरी साळुंखे

डॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे हे मराठीतले लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. ते सातारा शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे ३१-५-२००३पर्यंत विभागप्रमुख आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ ...

                                               

जयप्रकाश सावंत

जयप्रकाश सावंत हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक हिंदी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. लोकवाङ्मयगृह ह्या प्रकाशनसंस्थेचे एक संपादक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. सावंत हे हाफकिन इन्स्टिट्यूट येथे कामाला होते. सेवानिवृत्तीनंतर लोकवाङ्मयगृहाचे एक सं ...

                                               

सीमा गोखले

सीमा सुधाकर गोखले या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचा जन्म बनारसचा, बालपण तेथेच गेले. बनारसमध्ये जोगळेकरांचा मोठा वाडा होता. वडील वकील होते. सीमा जोगळेकर शिक्षणासाठी महाराष्ट्रात आल्या. त्यांनी प्रारंभी शाळा-काॅलेजाच्या मासिकांतून लिखाण केले. त्या ब ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →