ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 16                                               

कर्बभार

कर्बभार किंवा कार्बन फूटप्रिंट म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा घटनेमध्ये, किंवा दर वर्षी एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा इमारतीद्वारे होणारे एकूण हरितगृह वायूंचे उत्सर्जन. अतिशीत प्रदेशांत हिवाळ्यातही काचेच्या बनवलेल्या हरितगृहांमध्ये वातावरण उब ...

                                               

क्योटो प्रोटोकॉल

जपान देशातील क्योटो शहरात जगातील प्रमुख देशांची जागतिक वातावरण बदलाच्या नियंत्रणासाठी १९९७ साली बैठक झाली, त्या बैठकीत झालेल्या कराराला क्योटो प्रोटोकॉल असे संबोधले जाते. ११ डिसेंबर १९९७ रोजी क्योटो प्रोटोकॉल स्वीकारण्यात आला.

                                               

घनकचरा

शहरांमधील कचरा हा गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्‍न बनत चालला आहे. आपल्या भोगवादी समाजाकडून रोज प्रचंड प्रमाणात घनकचरा टाकला जातो. संपूर्ण जगात प्रतिवर्षी सुमारे १०० कोटी टन कचरा निर्माण होत असावा असा अंदाज आहे. हा सगळा कचरा एके ठिकाणी रचला तर माऊंट ए ...

                                               

घूर्णवात

जमिनीवर कमी दाबाच्या जागेभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे चक्रीवादळसदृश संरचनेस घूर्णवात किंवा टोरनॅडो म्हणतात. घूर्णवातात एका नरसाळ्याच्या आकाराच्या आकाशातून सुरुवात झालेल्या ढगाचे टोक जमिनीला लागलेले असते. हे टोक वेगाने एका ठिकाणापासून दुसरीकडे प ...

                                               

चक्रीवादळ

चक्रीवादळ हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्याला हरिकेन, आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळा ...

                                               

चोरटी शिकार

अनाधिकृतपणे कायदे धाब्यावर बसवून बंदी असलेल्या प्राण्यांची शिकार करणे म्हणजे चोरटी शिकार. चोरटी शिकार ही मुख्यत्वे आर्थिक लाभासाठी केली जाते. हे शिकारी वन्य प्राण्यांचे उपयुक्त अवयव या संबधित तस्करांना विकतात व पैसा कमवतात. जितका प्राणी दुर्मिळ व ...

                                               

जलयुक्त शिवार आणि नदी व नाले खोलीकरण

जलयुक्त शिवार म्हणजे शिवारात पडलेले पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये मुरवणे किंवा जमिनीवर वर्षभर साठवून ठेवणे. जलयुक्त शिवार योजनेमुळे नाल्यामध्ये पाणी जास्तीत जास्त दिवस नदी साचून राहील व विहिरी कोरड्या पडणार नाहीत. त्याअंतर्गत गावाच्या पाणलोट क्षे ...

                                               

जागतिक जल दिन

जागतिक जल दिन हा एक आंतरराष्टीय दिवस आहे.प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेल ...

                                               

जागतिक महासागर दिन

जागतिक महासागर दिन जगभर ८ जून रोजी पाळला जातो. २००८ सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. त्यापूर्वी १९८२ सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. केनडा स्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आह ...

                                               

पर्यावरणशास्त्र

निसर्गामधील सजीव आणि निर्जीव घटकांचा परस्पर संबंध म्हणजे इकॉलॉजी होय. आणि ज्या विषयांतर्गत याचा अभ्यास केला जातो तो म्हणजे पर्यावरणशास्त्र होय. पर्यावरणशास्त्र हा अनेक विषयांना स्वतः मध्ये सामावुन घेणारा विषय आहे, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास ...

                                               

पॅरिस करार

पॅरिस करार, पॅरिस एकमत तथा पॅरिस पर्यावरण करार हा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक वातावरण बदलाच्या सभेतील एक करार आहे. हा करार हरितगृह वायूच्या उत्सर्जन, उपशमन व त्यासाठीच्या आर्थिक तरतुदींबद्दल आहे. १९५ देशांच्या प्रतिनिधींनी वातावरण बदलाच्या सभेच्य ...

                                               

भूदृश्य

कोणताही भूभाग संपूर्णतया एकसुरी नसतो, वेगवेगळ्या अधिवासांनी बनलेला असतो. अशा अधिवासांच्या साधारण हेक्टर अथवा जास्त क्षेत्रफळाच्या तुकड्यांना भूदृश्य म्हटले जाते.

                                               

माघ पौर्णिमा

माघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. ४८३ ला ४५ वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा व माघ पौर्णिमा एवढेच महत्त्व प्राप ...

                                               

मृणालिनी वनारसे

मृणालिनी वनारसे या पर्यावरणाधारित तत्वज्ञानच्या अभ्यासक, संशोधक व लेखक आहेत. त्या गेली दहाहून अधिक वर्षे Natural Resource Management and Environmental Education या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचे वास्तव्य पुणयात असते. त्यांची राहणी त्याच्या पर्य ...

                                               

वृक्षारोपण

वृक्षारोपण ही विविध प्रकारच्या झाडांची जाणीवपूर्वक केलेली लागवड होय. शासकीय banyan जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे या साठी मोठ्या पातळीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहोर, निलगिरी अ ...

                                               

वेळ अमावास्या

वेळ अमावास्या हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद,लातूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो.भारतीय ...

                                               

सह्याद्री

सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. ही अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळन ...

                                               

सालुमरद थिम्माक्का

सालुमरद थिम्माक्का या कर्नाटक राज्यातील बेंगळूरूपासून ८० किमी अंतरावर असणाऱ्या हुलिकल या गावातील पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत व्यक्ती आहे. त्यांचे वय १०५ वर्षे असून अलीकडेच भारत सरकारणे त्यांना २०१९ चा पद्मश्री पुुुरस्कारा तसेच त्यांना नुकताच BB ...

                                               

सीआरझेड

कोस्टल रेग्युलेशन झोन सागरतटीय नियमन क्षेत्र, सागर किनाऱ्यांचे पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून संरक्षण व संवर्धन होण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या अंतर्गत फेब्रुवारी, १९९१ मध्ये केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयातर्फे अधिसूचना काढण्यात आली. ...

                                               

अनुकृतीचा सिद्धांत

अनुकृतीचा सिद्धांत हा सॉक्रेटीसचा शिष्य आणि ॲरिस्टॉटलचा गुरु प्लेटो याने सुमारे इ. स. पूर्व २०० वर्षापूर्वी मांडलेला साहित्यसिद्धांत आहे. हा सिद्धांत त्याने त्याच्या पोएटिक्स या ग्रंथात मांडला आहे. तो त्याचा गुरु प्लेटो याने ललित कलेवर घेतलेल्या ...

                                               

अपरांत

"अपरा" याचा अर्थ पश्चिम असा होतो, आणि म्हणून पश्चिम दिशेचा "अंत" म्हणजेच अपरांत. भारतातील पश्चिम किनाऱ्यालगतच्या कोकण किनारपट्टीला बौद्धकाळात अपरांत म्हणत, आणि क्वचित आजही कोकणाला अपरांत म्हणतात. या अपरांत भूमीची राजधानी होती शूर्पारक. हिलाच नाला ...

                                               

अमृतवेल (कादंबरी)

अमृतवेल ही वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली एक कादंबरी आहे. वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात.या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,"माणसाचं सर्वात जास्त प्रेम जगण्यावर असतं!" अलकनंदा एम.ए. शिकलेली हुशार, ध्येयवादी आणि गोड तरुणी. एका सुसं ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही ...

                                               

आदिवासी साहित्य संमेलन

ही संमेलने वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या नावांनी भरवतात. अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन, आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन, दलित आदिवासी साहित्य संमेलन, दलित-आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन, जागतिक आदिवासी साहित्य संमेलन, जागतिक आदिवासी युवक यु ...

                                               

एकसष्ट अलंकार (साहित्य शास्त्र)

एकसष्ट अलंकार - २० विशेषोक्ति, ४८ अधिक, २५ व्याजस्तुति, ३० काव्यलिंग, ४७ विषम, ५२ स्मरण, ७ अपह्लुति, ३८ परिसंख्या, ४६ सम, २७ विनोक्ति, १५ दीपक, ५९ व्याघात, ५४ प्रतीप, ३७ व्याजोक्ति, ५ ससंदेह, ३५ अनुमान, ५५ सामान्य, ५० मीलित, ५३ भ्रांतिमान्, ४० अन ...

                                               

कादंबरीकार

कादंबरी लेखन करणाऱ्या लेखकास कादंबरीकार असे संबोधले जाते. मराठी भाषेत अनेक थोर कादंबरीकार होऊन गेले. कादंबरीकार हे आपल्या लेखणीच्या बळावर वाचकाला काल्पनिक विश्वात घेऊन जातात, व कादंबरीतील व्यक्तींना जाणवणाऱ्या भावविश्वाची ओळख करून देतात.

                                               

कॅथार्सिस

कॅथार्सिसचा सिद्धांत साहित्य व सौंदर्यशास्त्रातील महत्त्वाचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत इ.स. पूर्व २०० वर्षापूर्वी ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्याने त्याच्या पोएटिक या ग्रंथात मांडला होता. शोकांतिकेच्या आस्वादाच्या प्रक्रियेचे सौंदर्यशास्त्रीय विश ...

                                               

गंगासती

गंगुबाई. गुजरातमधील प्रसिद्ध संतकवयित्री. त्यांच्या पूर्वजीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. लोककथेनुसार, गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात त्यांचा जन्म १२ व्या ते १४ व्या शतकादरम्यान राजपारा गावातील राजपूत कुटुंबात झाला.विवाह कहळुभा गोहेल याच्याशी ...

                                               

ग्रंथालय

ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अति समृद्ध ग्रंथालय होते. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे-महाराजे आ ...

                                               

जयपूर साहित्य उत्सव

जयपूर साहित्य उत्सव हा जयपूर मध्ये साजरा होणारा साहित्य उत्सव आहे. जानेवारी महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो. याचा कालावधी पाच दिवस असतो. हा उत्सव दिग्गी राजवाड्यात भरवला जातो. या उत्सवाची मूळ कल्पना फतेह सिंह यांची आहे. हा जयपूर विरासत फाउंडेशन ...

                                               

दिवाळी अंक

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात. दिवाळीअंक हे मराठी वाङ्‌मयीन संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. दिवाळी सणाच्या सुमारास निघणार्‍या विशेष अथवा वार्षिक नियतकालिकांना दिवाळी अंक असे म्हणतात. मनोरंजन ह ...

                                               

नाट्य शास्त्र

नाट्यशास्त्र नाट्यशास्त्राची निर्मिती भरत मुनींनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली अशी आख्यायिका सांगण्यात येते. नाट्यशास्त्राच्या निर्मितीचा नेमका काळ ठाऊक नसला तरी इ.स.पू. ४०० ते इ.स.पू. २००च्या दरम्यान ह्याची निर्मिती झाल्याचे कळते. ...

                                               

नियतकालिक

नियतकालिक: एका ठरावीक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिक म्हणतात. नियतकालिकांचे अनेक प्रकार असू शकतात उदा० मासिक - दर महिन्याला वार्षिक - वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक - दर आठवड्याला षण्मास ...

                                               

साहित्याची निर्मितिप्रक्रिया

साहित्याची निर्मितिप्रक्रिया ही साहित्यशास्त्रातील एक संकल्पना आहे. लेखन करताना लेखकाची कोणती मानसिक प्रक्रिया घडून येते याचा अभ्यास यात होतो. कलेच्या निर्मितीतील एक महत्त्वाची चर्चा म्हणून निर्मितिप्रकियेचा विचार मानला जातो. प्राचीन व आधुनिक अशा ...

                                               

पुस्तक

पुस्तक हे लिखित, छापलेल्या व कोऱ्या कागदापासून व चर्मपत्रे, झाडाच्या पानांपासून किंवा इतर कोणत्याही साहित्यापासून बनविलेल्या पानांचे एकत्रित संकलन असते.त्याच्या एका बाजूस बिजागऱ्यागत सांधा असतो. पुस्तकाच्या एका तावास वा कागदास पान म्हणतात. तर त्य ...

                                               

बाल साहित्य

बालसाहित्य म्हणजे मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेले वाङ्मय. या वाङ्मयात, राजा-राणी, राजकन्या, पऱ्या, देवदूत, बोलणारे प्राणी, जादुगार, राक्षस आणि सद्गुणी- दुर्गुणी माणसे असतात. असे वाङ्मय लिहिणारे जगात अनेक लेखक होऊन गेले. हॅन्स ख्रिश्चन ॲन् ...

                                               

भरताचे नाट्यशास्त्र

ख्रिस्तपूर्व काळात भारतात भरत नावाचे मुनी होऊन गेले. त्यांनी नाट्यकलेवर एक ३६ अध्यायी ग्रंथ लिहिला. तोच ग्रंथ भरताचे नाट्यशास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे. अशी आख्यायिका आहे की देवतांनी ब्रम्हदेवास सर्वसामान्यांस कळतील असे वेद निर्माण करण्यास सांगितले ...

                                               

मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश

भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद येथे असलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेचे औरंगाबादला स्थलांतर झाले. त्यामुळे हैदराबादमधील मराठी साहित्यिक वातावरण विचारात घेऊन येथे इ.स. १९५८ मध्ये ’मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश’ या संस्थेची स्थापना झाली. ...

                                               

मालगुडी डेज

मालगुडी डेज ही आर.के. नारायणलिखित कथामालिका आहे. १९३५ साली त्यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲण्ड फ्रेण्ड्स नावाची आपली पहिली लघु कथा मालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. ...

                                               

मासिक

मासिक म्हणजे मुद्रित अथवा इलेक्ट्रोनिकरित्या इन्टरनेटवर प्रकाशित दर महिन्यास प्रकाशित होणारे नियतकालिक होय. पूर्वी मासिक मुदित असे परंतु हल्ली अनेक मासिक हे आंतरजालावर प्रकाशित होत असतात. सामान्यत: मासिएक नियतकालिक प्रकाशन आहे हे, छापलेली किंवा इ ...

                                               

विज्ञानकथा

विज्ञानकथा हा एक वैशिष्ट्यपूर्ण वाङ्‌मय प्रकार आहे. हा ललितकथेच्याच निकषाला अनुसरून गुंफला जातो. विज्ञानकथा ही माणसांची कथा असते. विद्यमान विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकाळात प्रक्षेप करून भविष्यकाळातील माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणा ...

                                               

वेध (पुस्तक)

वेध: बाबाचं मला सगळ्यात आवडणारं पुस्तक म्हणजे वेध! हे त्याचं पहिलं वहिलं आणि आतून आलेलं लिखाण. त्याच्या गद्धेपंचविशीत पोटतिडकीनं लिहिलेले लेख. आपल्या लिहिण्यानी कुणाला काय वाटेल याचं अजिबात ओझं न घेता बेधडकपणे लिहिलेलं. आणि त्यामुळेच मनाला भिडणार ...

                                               

समीक्षा

मराठी शाब्दबंधानुसार एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन म्हणजे समीक्षा अथवा समीक्षण होय.एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरणास अथवा विस्ताराने केलेल्या निरूपणास मरा ...

                                               

साहित्याचे प्रयोजन

डॉ. देवानंद सोनटक्के यांच्या मते, कलावंत कशासाठी कला निर्माण करतो आणि रसिक कोणत्या हेतूने तिचा आस्वाद घेतो, स्वीकार करतो या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रयोजनविचार महत्त्वाचा आहे. कलानिर्मिती ही व्यावहारिक गोष्ट नाही, त्यामुळे तिच्या निर्मितीचे प्रय ...

                                               

हेमा टोबियम जी

डॉ.रा.कृ. गाडगीळ ऊर्फ हेमा गाडगीळ यांनी त्यांच्या गुहागर जवळच्या गिमवी गावात आढळणाऱ्या ’सिस्टोसोमिया हिमा टोबियम’ नावाच्या एका असाध्य रोगावर संशोधन करून एक लस शोधून काढली. त्या प्रयत्नांची हकीकत आणि डॉ. गाडगीळांनी त्यांच्या ८८ वर्षांच्या दीर्घ आय ...

                                               

अभिजात भाषा

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत. भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे भाषेला स्वतःचे स्वयंभूपण ...

                                               

राजभाषा

राजभाषा ही एखाद्या राज्य किंवा देशाची घोषित भाषा असते, जी सर्व राजकीय प्रायोजनात वापरली जाते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३ नुसार देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या कामकाजाच्या भाषा आहेत, तसेच भारतीय संविधानात राज्य आणि के ...

                                               

जगातील भाषांची यादी

The following are भाषे which were not properly sourced for where they were included, or which have not yet been added Varhadi-Nagpuri साचा:Ethnolink ७.० Lambadi साचा:Ethnolink ६.० Mewati साचा:Ethnolink ५.० Mainfränkisch साचा:Ethnolink ४.९ Souther ...

                                               

अनुनासिक

बोलताना जो नाकातून ओझरता असा उच्चार होतो त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. आणि ज्या अक्षराचा असा उच्चार होतो त्या अक्षराला अनुनासिक उच्चाराचे अक्षर असे म्हणतात. उदा० अं, हं, लें, हिंदीमधले मॉं, फ्रेन्चमधले रेस्त रां वगैरे. मराठी मुळाक्षरांमध्य ...

                                               

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी फेब्रुवारी २१ साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्को ने हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" म्हणून जाहीर केला.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →